Premium

मुंबई: परिसरातील कचऱ्याची आजपासून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर तक्रार करता येणार

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक ५ जूनपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

citizens complain garbage today whatsapp chatbot mumbai
मुंबई : परिसरातील कचऱ्याची आजपासून 'व्हॉट्सॲप चॅटबॉट'वर तक्रार करता येणार (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यात, कुठेही साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची पालिकेकडे ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. या तक्रारीनंतर घनकचरा विभागाकडून त्वरित तेथील कचरा उचलला जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक ५ जूनपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.

सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा… सीरमची लस, कंपनीची बदनामी करणारी वक्तव्ये हटवा

या क्रमांकावर नागरिकांना “कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे” या तक्रारीसंबंधीचे थेट छायाचित्र पाठवता येणार आहे. नागरिकांनी छायाचित्रासह, त्या ठिकाणाचा पत्ता, जीपीएस लोकेशन देणे आवश्यक आहे.

हेही वाचा… समूह पुनर्विकासासाठी अधिमूल्यात ५० टक्के सवलत का महत्त्वाची?

व्हॉट्सॲप चॅटबॉटवर केलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. तक्रार निर्मुलनाकरीता सध्या लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे त्वरित निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबई खरोखरच स्वच्छ सुंदर दिसेल अशी अपेक्षा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Citizens can complain about the garbage in the area from today on whatsapp chatbot mumbai print news dvr

First published on: 05-06-2023 at 15:34 IST
Next Story
सीरमची लस, कंपनीची बदनामी करणारी वक्तव्ये हटवा