अंमलात येण्यापूर्वीच कल्पना बासनात

इंद्रायणी नार्वेकर

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

मुंबई : मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने दंड वसुली करण्याची कल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच बारगळली आहे. यासाठी पालिकेने माहिती तंत्रज्ञान विभागाची मदतही घेण्याचे ठरवले होते. मात्र नागरिकांकडून या पद्धतीला कसा प्रतिसाद मिळेल याचा विचार करून ही कल्पना पालिका प्रशासनाने आधीच गुंडाळून ठेवली आहे.

मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांकडून कायद्यानुसार २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. या दंड वसुलीसाठी पालिकेने मुंबईत ठिकठिकाणी क्लिन अप मार्शलची नेमणूक केली आहे. करोना रुग्णांची संख्या वाढली की मुखपट्टविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधातील दंडात्मक कारवाईला वेग येतो. नागरिक व क्लिन अप मार्शलमधील तंटय़ांची प्रकरणेही वारंवार ऐकायला मिळतात. अनेकदा खोटे क्लिन अप मार्शल लोकांना दरडावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. तर कधी नागरिकही आपल्याकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत असे सांगून निसटू पाहतात किंवा थोडेथोडके पैसे लाच म्हणून देतात आणि स्वत:ची सुटका करून घेतात, असेही प्रकार उघडकीस आले आहेत. त्यावर पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. मार्शलना गणवेश देणे, गणवेशावर त्यांचे नाव व विभाग व अन्य माहिती छापलेली असणे, मार्शलना वागणुकीचे प्रशिक्षण देणे असे उपाय केल्यानंतरही या प्रकारांना आळा बसत नव्हता. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने पैसे घेण्याची सोय करावी अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली होती. त्यादृष्टीने पालिकेच्या घनकचरा विभागाने चाचपणीही सुरू केली होती.

पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची त्याकरिता मदतही घेण्यात येत होती. दंड वसुलीसाठी मोबाइल अ‍ॅप किंवा तशीच काही यंत्रणा सुरू करता येते का याकरीता चाचपणी सुरू होती. मात्र अशी काही अद्ययावत यंत्रणा आली तरी ती कितपत यशस्वी होईल याबाबत पालिका प्रशासनाला शंका वाटत असल्यामुळे ही योजना बारगळण्याची चिन्हे आहेत. ऑनलाइन यंत्रणा आली तरीही नागरिकांनी दंड न देण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. एटीएम कार्डने पैसे घ्यायचे ठरवले तरी माझ्याकडे कार्ड नाही  किंवा माझ्याकडे ऑनलाइन पैसे भरण्यासाठी संबंधित अ‍ॅप नाही, असेही सांगितले जाऊ शकते. त्यामुळे लोकांमध्ये मुखपट्टीचा वापर करण्याविषयी जनजागृती करणे हाच त्यावरचा उपाय आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दंडात्मक कारवाई करणाऱ्या क्लिन अप मार्शलने गणवेश घातला आहे का, गणवेशावर त्याचे नाव आहे का, तो पावती देतो का याचीही खातरजमा नागरिकांनी करावी, असेही आवाहन त्यांनी केले. तसेच क्लिन अप मार्शलची तक्रार करण्यासाठी मदत क्रमांकही जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

४३ लाख नागरिकांवर कारवाई

दरम्यान, १८ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार पालिकेने गेल्या दीड वर्षांत मुखपट्टीविना फिरणाऱ्या ४३ लाखांहून अधिक नागरिकांकडून ८६ कोटी ४२ लाख रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वेच्या हद्दीत केलेल्या कारवाईतून ४७ लाख ७८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून १६ कोटी ९१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर क्लिन अप मार्शलनी ६९ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.