scorecardresearch

Premium

मुंबई: मध्य रेल्वेवर ‘स्वच्छ रेल्वेगाडी’ दिवस

राष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने नुकताच ‘स्वच्छ रेल्वेगाडी’ दिवस पाळला.

central railway
मुंबई: मध्य रेल्वेवर 'स्वच्छ रेल्वेगाडी' दिवस( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई : राष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने नुकताच ‘स्वच्छ रेल्वेगाडी’ दिवस पाळला. या दिवशी मध्य रेल्वेच्या विभागातील कोचिंग आगारातील आणि स्थानकातील निवडक रेल्वेगाड्यांची साफसफाई करण्यात आली.

मध्य रेल्वेवर १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्थानके, रेल्वे कार्यालये, वसाहती, कारखाने, देखभाल डेपो, रुग्णालये यांची स्वच्छ करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागांत ‘स्वच्छ रेल्वेगाडी’ दिवस पाळण्यात आला. मुंबई विभागातील सर्व कोचिंग आगारात रेल्वेगाड्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचबरोबर ‘स्वच्छता राखा’, ‘कचरा कचराकुंडीत टाका’ या आशयाचे फलक लावण्यात आले होते.

special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
Railway block for technical works
तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द
train
पायाभूत सुविधा निर्माण कार्याचा रेल्वे गाड्यांना फटका; ‘या’ रेल्वे गाड्या रद्द व ‘यांच्या’ मार्गात बदल
trains Nagpur cancelled
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूरमार्गे धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्या रद्द, वाचा सविस्तर…

हेही वाचा >>>मुंबई : ‘या’ तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे नव्या वर्षात सुरू होणार

पुणे विभागातील स्थानकात उभ्या असलेल्या निवडक रेल्वेगाड्यांची साफसफाई करण्यात आली. रेल्वेगाडीची आतून-बाहेरून स्वच्छता करण्यात आली. भुसावळ, नागपूर विभागात रेल्वेगाड्याच्या खिडक्या, दरवाजे, पंखे, स्वच्छतागृहाचीही स्वच्छता करण्यात आली. सोलापूर विभागातील रेल्वेमध्ये कायम स्वच्छता राखण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली. रेल्वेमधील पॅन्ट्री कार, आसन, शौचालय, कचराकुंड्यांची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cleanliness fortnight has been organized on central railway in the background of national cleanliness day mumbai print news amy

First published on: 23-09-2023 at 17:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×