scorecardresearch

Premium

मुंबई: बीडीडीतील झोपडीपट्टी आणि दुकानदारांच्या पात्रता निश्चितीचा मार्ग मोकळा

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात बीडीडीतील झोपडीधारक आणि दुकानदारांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून पात्रता निश्चितीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

BDD
राज्य सरकारकडून पात्रता निश्चितीसाठीच्या पुराव्यांची, कागदपत्रांची निश्चिती (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात बीडीडीतील झोपडीधारक आणि दुकानदारांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून पात्रता निश्चितीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

motorized garbage collection vehicle, strike of contract basis workers
चंद्रपूर : आता कचरा संकलन होणार मोटराइज्ड घंटागाडीने, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेची व्यवस्था
Meeting RBI Monetary Policy Committee decision interest rates announced friday
‘बुलेट’ परतफेड योजना म्हणजे काय? ज्यावर RBI ने केली मोठी घोषणा; सोन्याचा कर्जाशी काय संबंध?
Bombay High Court Bharti 2023
मुंबई उच्च न्यायालयात ‘जिल्हा न्यायाधीश’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती सुरु; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
Maharashtra Real Estate Regulatory Authority, MahaRERA, MahaRERA seizes bank accounts of 388 developers, developers restricted to sell house by mahaRERA
३८८ स्थगित प्रकल्पांतील बँक खाती गोठवण्याचेही महारेराकडून आदेश! सदनिकांच्या विक्रीवर बंदी

ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीयेथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. या पुनर्विकासात तेथील झोपडीधारक आणि दुकानदारांना सामावून घेण्याची मागणी होत होती. ती मान्य करून राज्य सरकारने झोपडीधारक आणि दुकानदारांची पात्रात निश्चिती करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. मात्र त्यासाठी कोणते पुरावे किंवा कागदपत्रे सादर करायची हे निश्चित नव्हते. त्यामुळे पुनर्विकासात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सामावून घेण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने झोपडीधारक, दुकानदार चिंतेत होते. पण आता मात्र त्यांची ही चिंता दूर होणार आहे.

आणखी वाचा-रविवारी हार्बर मार्गावरून रेल्वेने प्रवास करायचाय? आधी वेळापत्रक बघा

राज्य सरकारने झोपडीधारक आणि दुकानदारांसाठी पात्रता निश्चितीचे निकष अंतिम केले आहेत. शासनाने कागदपत्रांची यादी जाहीर केली असून त्यानुसार बृहन्मुंबई महानगर पालिकेची दंडाची पावती, पालिकेची सर्व्हे पावती, पालिकेने दुकानदार, स्टॉलधारकांना बजावलेली नोटीस, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस, मुंबई विकास विभाग चाळीच्या संचालक किंवा व्यवस्थापक यांनी बजावलेली नोटीस किंवा दंड पावती, मुंबई विकास विभाग चाळीच्या संचालक अथवा व्यवस्थापक यांनी अभिलेखातील गाळा नियमित केल्याच्या आदेशाची प्रत या सहा पुराव्यांपैकी कोणतेही तीन पुरावे झोपडीधारकांनी, दुकानदारांनी सादर करायचे आहेत.

आणखी वाचा-‘सलोखा’ योजनेपासून शेतकरी दूरच; आतापर्यंत २२० दस्तांची मुद्रांक विभागाकडे नोंदणी

झोपडीधारक आणि दुकानदारांकडे वरील पुरावे नसल्यास त्यांना इतर पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनिवासी झोपडीचा वा दुकानाच्या क्रमांकाचा उल्लेख असलेला किंवा बीडीडी चाळीतील ठिकाण दर्शविणारा पालिकेचा १ जानेवारी २००० अथवा त्यापूर्वीचा गुमास्ता परवाना, खानावळ परवाना, उपहार गृह परवाना किंवा त्याअनुषंगाने भरण्यात आलेल्या कराची पावती पुरावा तसेच कागदपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तेव्हा आता या पुराव्याच्या, कागदपत्रांच्या आधारे झोपडीधारक आणि दुकानदारांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clear the way for determination of eligibility of slum and shopkeepers in bdd mumbai print news mrj

First published on: 20-08-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×