मुंबई: नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळाच्या अनावरणावरून आज मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सेनेचे मंत्री प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता आहे. शनिवारी नवी मुंबईतील विमानतळावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे सेनेचे मंत्री नाराज आहेत. विरोधकांनी यावर सडकून टीका केली. राज्य शिष्टाचार का पाळला गेला नाही याची विचारणा मुख्यमंत्री कार्यालयानेही सिडकोकडे केली आहे. त्यामुळे हा विषय आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. सिडको हे महामंडळ एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ अधिपत्याखाली येणारे महामंडळ आहे.

त्यामुळे या महामंडळाच्या अनुषंगाने होणाऱ्या प्रत्येक घटनेची कल्पना मंत्री या नात्याने शिंदे यांना देणे क्रमप्राप्त आहे. परंतु शनिवारी झालेल्या अर्ध पुतळा अनावरण कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याने हा प्रशासकीय निर्णय आहे की राजकीय यावर चर्चेला उधाण आले आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. या धुसफूस चा प्रत्यय विमानतळावरील अर्ध पुतळा अनावरणाच्या वेळी आल्याचे दिसून आले. त्यामुळे हा विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान राजे शिष्टाचार का पाळला गेला नाही. याची विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने सिडकोकडे केल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण का देण्यात आले नाही, अशी विचारणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने सिडकोकडे केल्याचे समजते. शिंदे यांना या अनावरण सोहळ्याला निमंत्रण देण्याचे टाळण्यात आल्याने विरोधक आणि शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी टीका केली होती.

नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. शिंदे हे तर सिडको महामंडळाचे मंत्री आहेत. विरोधकासही शिंदे सेनेतील नेत्यांनी यावरुन सिडकोवर टीका केली. सिडको या प्रकल्पात आजही २६ टक्के भागिदार आहे. सर्व बाजूने टीका झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे विचारणा केली असल्याचे समजते.