मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळ महाकुंभ तयार करावे. देशभरातील व राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिल्या.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषांगिक विकासकामे आदींबाबत फडणवीस यांनी आढावा घेतला. नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

thieve with koyta roaming arround in New Nashik
नवीन नाशिकमध्ये कोयताधारींचा धुडगूस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
cheap Ayush Ayurvedic Medicine
देशभरात स्वस्तातील आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ

पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे ८ ते १० हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या. समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे काँक्रिटीकरण व रूंदीकरण करण्यात यावे. जे मार्ग २०२७ पर्यंत बांधणे शक्य आहेत, त्यांचेच बांधकाम हाती घेण्यात यावे. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा, अशा अनेक सूचना फडणवीस यांनी या वेळी दिल्या.

भूसंपादन करा, अतिक्रमणे हटवा

● सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. नाशिक-त्र्यंबकेश्वर हा धार्मिक परिसर किंवा क्षेत्र (रिलिजियस हब) म्हणून विकसित करावा.

● प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील भूसंपादन करण्यात यावे. अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.

चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दक्षता घ्या : शिंदे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या अडचणी येत असतील, त्या सोडविण्यात याव्यात. साधुग्रामकरीता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

Story img Loader