scorecardresearch

Premium

गणपती बाप्पांकडे काय मागितलंत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनीही गुरुवारी त्यांच्या घरच्या गणपती बाप्पाला निरोप दिला. (PC : Eknath Shinde Facebook)

महाराष्ट्रात गेले १० दिवस गणेशोत्सव मोठ्या ज्ल्लोषात साजरा करण्यात आला. १० दिवस गणरायाची सेवा करून गणेशभक्तांनी गुरुवारी (२८ सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वर्षा बंगल्यावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबांनेही काल बाप्पाला निरोप दिला. विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. गणरायाकडे त्यांनी राज्यासाठी काय मागितलं हेही यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेले १० दिवस खूप आनंदात गेले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बाप्पाला निरोप देताना नेहमीच मन भावूक होतं. यावेळीसुद्धा मन भावूक झालं. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.

CM Eknath Shinde came to Satara and wished Udayanraje on his birthday
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
MP Rajan vichare
माझ्या जीवाचे काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार – खासदार राजन विचारे
Uday Samant about Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुन्हेगारांच्या छायाचित्रांबाबत उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत कोणी छायाचित्र काढल्यास…”
Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
राजीनामा दिल्यानंतर कॅबिनेटमध्ये काय घडलं? छगन भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं अन् मला…”

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं की, यंदा गणपती बाप्पांकडे काय मागितलंत? त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, बाप्पाला सगळं माहिती आहे. गणपती आले त्याच दिवशी बाप्पाकडे संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, शेतकऱ्यांवरचं संकट दूर कर असं साकडं घातलं. शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगलं पिक येऊ दे, राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस येवोत, असं साकडं बाप्पाचरणी घातलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde answers what did he ask lord ganesha for maharashtra asc

First published on: 29-09-2023 at 08:06 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×