मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई सुरू आहे. अलीकडेच ‘मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदे यांनी माझ्यासमोर वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी’ असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. परिणामी दोन्ही बाजूंमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आता याच पार्श्वभूमीवर सागरी किनारा मार्गांतर्गत वरळी येथे पुलांच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याची मागणी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने मान्य केल्यामुळे, वरळीतील आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात मच्छीमार संघटनांकडून दोघांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोळी समाजाने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून शिंदे गट व भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. एकप्रकारे आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला जोरदार प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

हेही वाचा >>> कामाठीपुऱ्याचे सर्वेक्षण करणार; घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाचा निर्णय

Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

दादर स्थानकापासून ते आदर्श नगर येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानापर्यंत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फलकबाजी आणि जागोजागी भगवे झेंडे व भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. मुंबईतील विविध भागांतील कोळी समाजातील नागरिक पारंपरिक पेहरावात, खास कोळी वाद्यवृंदाच्या तालावर मनसोक्तपणे नाचत सत्कारस्थळी दाखल झाले आहेत.  या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येकाला कोळी समाजाची ओळख असलेली, पारंपरिक टोपी आयोजकांकडून देण्यात आली आहे.  वेसावकर मंडळींच्या कोळीगीतांच्या कार्यक्रमानंतर आता राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. आयोजन करण्यात आले होते. 

हेही वाचा >>> दाभोलकर हत्येशी संबंधित खटला : सुनावणी दोन – तीन महिन्यांत पूर्ण होईल, सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती

‘वरळी कोळीवाडा क्लिव्हलँड बंदर, १२० मी. नेव्हीगेशन स्पॅन’ याची कार्यक्रमस्थळी ठेवलेली प्रतिकृती लक्षवेधक ठरत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिंदे गटाने सणांची संधी साधून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून मतदारांवरची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य नागरी सत्कार हा वरळीतच करून शिंदे गट व भाजपने स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

व्यासपीठावर शिंदे गट व भाजपच्या नेत्यांची गर्दी व राजकीय फटकेबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर, आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर, संजय शिरसाट, माजी आमदार अशोक पाटील, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, यशवंत जाधव, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, सुशांत शेलार आणि भाजपचे नेते व आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, सुनील राणे, प्रसाद लाड, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेतेमंडळी उपस्थित आहेत. यावेळी अनेकांनी भाषणांमधून राजकीय फटकेबाजी करत आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आणि. . .खुर्च्या काढाव्या लागल्या!

कोळी समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणाऱ्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी बाहेरून आलेल्या कोळी बांधवांची संख्या जास्त होती.  अपेक्षेपेक्षा कमी गर्दी झाल्यामुळे, मैदानाच्या शेवटच्या भागातील खुर्च्या काढण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दाखल होणार होते, परंतु जवळपास दोन तास उशीरा ते  कार्यक्रमस्थळी पोहोचले.