scorecardresearch

मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणाबाबत केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, भल्या पहाटे पाहणी दौरा

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भल्या पाहाटे पाहणी केली.

CM Eknath Shinde inspected Mumbai
मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणाबाबत केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, भल्या पहाटे पाहणी दौरा (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

मुंबई : मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भल्या पाहाटे पाहणी केली. मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी तेथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच त्यांनी त्यात काही बदलही सुचवले.

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी महानगरपालिका पाण्याने रस्ते धुवून काढत आहे. पहाटे केल्या जाणाऱ्या या कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. तसेच रस्त्याच्या कडेला साचणारी धूळ आणि माती हटविण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहने आणि फॉग मशिन्स यांचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. ठिकठिकाणी स्वच्छता कामगार करीत असलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. तसेच मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी काही सूचना त्यांनी केल्या. या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली. संपूर्ण मुंबई आपल्याला स्वच्छ करायची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले.

Varsha Gaikwad
मुंबईतील खुल्या जागेचे धोरण रद्द न झाल्यास न्यायालयात जाणार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा इशारा
palghar District Headquarters
जिल्हा मुख्यालयाची समितीने केली एकांतात पाहणी; चौकशी गुंडाळण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी यांनी हाणून पाडला
revenue minister radhakrishna vikhe patil on water distribution, water distribution from dams of nashik and ahmednagar, water distribution from dams of nashik and ahmednagar to jayakwadi dam
जायकवाडी : जलसंपदा विभागाचे दोन विसंगत अहवाल, महसूलमंत्र्यांचा आक्षेप
panvel BJP leader Paresh Thakur request DCM Fadnavis relaxation arrears property tax
थकीत मालमत्ता कराच्या सवलतीसाठी पनवेलच्या भाजपचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीसांना साकडे घालणार

हेही वाचा – मुंबई-जीवी : सुमधुर आवाजाचा दयाळ

हेही वाचा – दिवाळखोर रिलायन्स कॅपिटलवर ‘हिंदुजां’च्या पाच संचालकांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेची सशर्त मान्यता

मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचीही त्यांनी विचारपूस केली. तसेच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही जाणून घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगार यावेळी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde inspected the measures taken by mumbai mnc regarding pollution mumbai print news ssb

First published on: 21-11-2023 at 10:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×