महिला आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात पोहोचले; म्हणाले, "दुर्धर आजाराशी..." | cm eknath shinde visited saifee hospital in mumbai to meet shivsena mla yamini jadhav who is fighting battle against cancer scsg 91 | Loksatta

महिला आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात पोहोचले; म्हणाले, “दुर्धर आजाराशी…”

उद्धव ठाकरेंनी आपली साधी विचारपुसही केली नव्हती असं या महिला आमदाराने एका मुलाखतीत म्हटलं होतं.

महिला आमदाराला भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात पोहोचले; म्हणाले, “दुर्धर आजाराशी…”
मुख्यमंत्र्यांनीच सोशल मीडियावरुन दिली माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील सैफी रुग्णालयामध्ये जाऊन कर्करोगाशी झुंज देणाऱ्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनीच या भेटीसंदर्भातील काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत.

नक्की वाचा >> “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

मुख्यमंत्री शिंदे यांनी जाधव यांची काल भेट घेतल्याची माहिती इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून दिली आहे. “शिवसेना आमदार सौ. यामिनी जाधव या कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली,” असं शिंदे यांनी या भेटीचे फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”

शिंदे यांनी या भेटीदरम्यान जाधव यांच्यावर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांसोबत त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा केली आणि त्यांच्यावर सुरु असणाऱ्या उपचारांबद्दलची सविस्तर माहिती घेतली. याबद्दलचाही उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच या वेळी यामिनी जाधव यांच्यासोबत काय बोलणं झालं याबद्दलची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी पोस्टमधून दिली आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची?

“सकारात्मक विचार बाळगून या दुर्धर आजाराशी सामना करावा अशी विनंती यामिनीताईंना केली. तसेच आई दुर्गेश्वरीच्या आशीर्वादाने आपण लवकरच पूर्णपणे बऱ्या होऊन पुन्हा एकदा संपूर्ण क्षमतेने कार्यरत व्हाल असे देखील त्यांना आश्वस्त केले,” असं शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान

मुख्यमंत्र्यांनी जाधव यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेना नेते आणि यामिनी यांचे पती यशवंत जाधव हे देखील उपस्थित होते. यामिनी आणि त्यांचे पती हे शिंदे समर्थक आमदार आहेत. बंडखोरीनंतर एका मुलाखतीमध्ये यामिनी यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल बोलताना कॅन्सरशी लढा देणाऱ्या आपल्या आमदाराची साधी विचारपुसही पक्षप्रमुखांकडून करण्यात आली आहे, असं म्हणत खंत व्यक्त केलेली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Mobile Ticketing App : प्रवाशांची मोबाइल तिकीट ॲपला पसंती

संबंधित बातम्या

खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
“मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा…”, शिवसेनेचे भाजपावर टीकेचे आसूड, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरूनही घेतला समाचार
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
करण जोहरचा बायोपिक येणार? ‘या’ अभिनेत्याने भूमिका साकारण्याची व्यक्त केली इच्छा
मधुमेह होण्याची सतत भीती सतावतेय ? तर आजपासूनच ‘हे’ ५ बदल करा
करोना, मेट्रो सेवा, कार्यालय स्थलांतराचा फटका; पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या संख्येत नऊ लाखांनी घट
विश्लेषण : रितेश-जिनीलियाच्या कंपनीची होणार चौकशी; मविआ सरकारदरम्यान लागले गैरव्यवहाराचे आरोप, नेमकं प्रकरण काय?
खळबळजनक! पिस्तुलातून गोळ्या झाडत कोयत्याने केले वार, पिंपरीत सिनेस्टाईल भर चौकात एकाचा खून