महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. “राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असं समजू लागले आहेत,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच राज ठाकरे हे भाजपाची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री खासदारांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील अनुभवही त्यांनी ऐकून घेतले आणि पुढील टप्प्यासाठी सूचना केल्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज ठाकरे हे भाजपाची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे. मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत.”

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?”
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

“अयोध्येत श्रीरामाचे मंदिर व्हावे यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केले. त्यावेळी मनसे काय करत होती, बाबरी मशीद प्रकरणावेळी राज ठाकरे कुठे होते,” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

‘विरोधकांना जशास तसे उत्तर द्या’

सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोधकांना जशास तसे उत्तर द्या. मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधलेला आहे. त्यांचे बेगडी रूप लोकांना दाखवून द्या, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिली.

मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्याठिकाणी येत असलेली राजकीय आव्हाने आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन पक्षसंघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे. पश्चिम विदर्भातही पक्षसंघटना बळकट करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा २६ ते २९ मे याकाळात राबवण्यात येणार असून त्याकाळात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात लोकांपर्यंत जायचे आहे. या ठिकाणीही सरकारच्या कामांचा उपयोग पक्षवाढीसाठी करायचा आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा : “महाराष्ट्रात चुकीची भाषा चालू देणार नाही”, अजित पवारांच्या इशाऱ्यावर मनसेच्या सरदेसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवक्त्यांच्या बैठकीत भाजपा व मनसेच्या हिंदूत्वाच्या राजकारणाचा समाचार घेतला. तसेच या दोन्ही पक्षांना आक्रमकपणे उत्तर देण्याचा पक्ष प्रवक्त्यांना आदेश दिला.