मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दहिसर येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या पुलाच्या कामांचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) दिले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाणपूल (मेट्रो रेल ब्रिज), चारकोप मेट्रो डेपो आणि डी. एन. नगर मेट्रो स्थानक येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी अंधेरीतील प्रस्तावित गुंदवली आणि त्यानंतर कांदिवली येथील मेट्रो स्थानकांच्या कामांची पाहणी केली, तसेच विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

प्रकल्पातील चारकोप मेट्रो डेपोत मेट्रो मार्गिकांवरील चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मेट्रोच्या इंजिनचीही त्यांनी माहिती घेतली. दहिसर येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या पुलाच्या कामांचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cm uddhav thackeray orders to complete metro works on time zws