उद्योग ‘महा’गाथेवर आज मंथन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह’; उद्यमी, प्रशासक, विश्लेषकांचा सहभाग

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह’; उद्यमी, प्रशासक, विश्लेषकांचा सहभाग

मुंबई : एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने आज, गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यासह उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि वरिष्ठ सनदी अधिकारी सहभागी होत आहेत. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जाईल आणि रूपरेखा मांडली जाईल.

या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन होईल. या वेळी त्यांचे बीजभाषण होईल. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री आदिती तटकरे हे उद्योग विभागाकडून उद्योगांच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देतील. ‘सीआयआय’चे अध्यक्ष आणि टाटी स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांचे या वेळी भाषण होईल. देशातील औद्योगिक उत्पादनाच्या १५ टक्के  उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकू ण महसुलापैकी जवळपास ४० टक्के  महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके  महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य के ले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. करोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या व त्यावर उपाय काय या अनुषंगाने या परिसंवादात आढावा घेतला जाईल.

परिसंवादात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या संदर्भात दोन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठीचा कृती आराखडा’ या विषयावरील सत्रात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. सच्चिदानंद शुक्ला, ‘ब्लू स्टार’चे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन हे सहभागी होणार आहेत.

‘पुढील दशकातील आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास’ या विषयावरील सत्रात मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) अध्यक्ष संजय सेठी, ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आणि ‘एल अँड टी’च्या विकास प्रकल्प विभागाचे प्रमुख शैलेश पाठक पायाभूत सुविधांच्या विकासाचा आराखडा सादर करणार आहेत. ही

संपूर्ण परिषद केवळ निमंत्रितांसाठीच आहे.

प्रायोजक

’मुख्य प्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

’ साहाय्यक  : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सिडको कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.

’कॉर्पोरेट पार्टनर : कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)

ऑनलाइन सहभागासाठी..

या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागासाठी क्यूआर कोडचा वापर करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cm uddhav thackeray will present in loksatta industrial conclave zws