रशियन जहाज मुंबईजवळ तटरक्षक दलाच्या ताब्यात

भारताच्या हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे एक रशियन जहाज तटरक्षक दलाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतले.

भारताच्या हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणारे एक रशियन जहाज तटरक्षक दलाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतले. मुंबईपासून ११० सागरी मैल अंतरावर हे जहाज होते.‘एम व्ही सेवस्टोपोल’ हे रशियन जहाज भारतीय सागरी हद्दीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना ते ताब्यात घेण्यात आले. या जहाजावरील दळणवळण यंत्रणा आणि लाईट बंद करण्यात आले होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. डॉनिअर एअरक्राफ्टच्या सहाय्याने हे जहाज मुंबईजवळ समुद्रात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या जहाजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु जहाजावरील कर्मचारी संपर्क साधत नव्हते. अखेर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला आणि जहाजावरील लाईटही लावण्यात आले. या जहाजाबाबत व्यावसायिक वाद मद्रास उच्च न्यायालयात असून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे जहाज ताब्यात घेण्यात आल्याचे तटरक्षक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coast guard forces captured russian ship near mumbai

ताज्या बातम्या