Abhijeet Dipke Video: कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने ०२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी सीजेपीचे संस्थापक दिपके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. दिपके मुंबईत शाहरुख यांचे घर मन्नतसमोर उभे असताना त्यांना त्यांची एक चाहती भेटली. या चाहतीने कार थांबवून दिपकेंना शुभेच्छा दिल्या तसेच, आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबईतील आंदोलनासाठी सीजेपीच्या दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईच्य रस्त्यावर दिपकेंसोबत घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान यांच्या मन्नत या घरासमोर ही घटना घडली.
झाले असे की दिपके त्यांच्या कार्यकर्त्यांसह शाहरुख खानच्या मन्नत घरासमोर उभे होते. यावेळी एक महिला कारमधून तिथे आली व दिपकेंना पाहून आश्चर्यचकीत झाली. दिपकेंना भेटल्यानंतर महिलेने आनंद व्यक्त केला. तसेच, या महिलेने ती शिक्षिका असल्याचे सांगितले शिवाय दिपकेंचे आभार देखील मानले. महिला फोटोसाठी दिपकेंना विनंती करुन नंतर संवाद साधला. दिपकेंनी मी आजही शाहरुख खान यांचा चाहता असल्याचे सांगितले.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओला अनेक लाईक्स दिल्या असून, या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. शाहरुख यांच्या मन्नत या घरासमोर हा प्रसंग घडल्याने नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
दरम्यान, सीजेपीकडून उद्या मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिपकेंनी पत्रकार परिषेदत याबाबत बोलातना कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केल आहे. सीजेपीच्या शिवाजी पार्कवरील जेलभरो आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.
