इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : देशभरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी पालिकेने कांजूरमार्ग येथे युद्धपातळीवर शीतगृह सुरू केले. मात्र पुरेसा लससाठा उपलब्धच होत नसल्यामुळे या शीतगृहाचा पूर्ण क्षमतेने वापरच होऊ शकला नाही. एक कोटी मात्रांची क्षमता असलेल्या या शीतगृहाचा वापर आता पोलिओ व अन्य लशींच्या मात्रा ठेवण्यासाठी केला जाणार आहे.

पुरेसा लससाठा नसल्यामुळे मुंबईतील पालिके च्या व सरकारी केंद्रांवरील लसीकरण या महिन्यात चार वेळा बंद ठेवावे लागले. जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी पालिके ने पूर्वतयारी म्हणून कांजूरमार्गमध्ये मध्यवर्ती लसभांडार अर्थात शीतगृह तयार के ले होते. मात्र सहा महिन्यांत राज्य सरकारकडून लशींचा पुरेसा पुरवठाच न झाल्यामुळे हे लसभांडार कधीही पूर्ण क्षमतेने वापरले गेले नाही. लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून पालिकेच्याच मालकीच्या परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाच हजार चौरस फू ट जागेत हे शीतगृह तयार के ले होते. या जागेची डागडुजी करून त्यात विशिष्ट तापमानाच्या खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. लससाठा आल्यानंतर तो या ठिकाणी साठवून ठेवायचा व मग तो सर्वत्र वितरित करायचा असे नियोजन होते. त्याचप्रमाणे आताही नियोजन होते आहे. मात्र सध्या दररोज एक दोन दिवस पुरेलइतकाच मर्यादित साठा उपलब्ध होतो आहे. जून महिन्यापासून लसीकरणाचा वेगही मंदावला आहे.

राज्य सरकारकडून लससाठा पुरेसा उपलब्ध होत नसताना पालिकेने लससाठा खरेदी करण्यासाठी जी तयारी के ली होती त्याची प्रक्रिया आता थांबली आहे. पालिके ने एक कोटी मात्रा खरेदी करण्यासाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियांना परदेशी कं पन्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच लसीकरणाबाबत के ंद्र सरकारची सतत बदलणारी धोरणे यामुळेही पालिके च्या लससाठय़ावर परिणाम झाला आहे.

पालिके ला आतापर्यंत मिळालेल्या लसमात्रा

जानेवारी    २,६५,०००

फे ब्रुवारी    ५,७१,०००

मार्च    ८,१०,९५०

एप्रिल      ९,४७,५००

मे      ५,२३,४४०

भविष्यात उपयोग

मुंबईत एकू ण ६५ लाख २४ हजाराहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी पालिके च्या के ंद्रांवर आतापर्यंत के वळ ३४ लाख १३ हजार नागरिकांना लस दिली गेली आहे. भविष्याचा विचार करून अतिशय कमी खर्चात हे के ंद्र उभारण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. प्रत्येक कं पनीच्या लशीसाठी वेगवेगळ्या तापमानाची गरज असल्यामुळे वेगवेगळ्या तापमानाच्या खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. मात्र याचा वापर भविष्यात पालिके च्या अन्य लशी, पोलिओचे डोस व एन्फु एन्झाच्या लशी साठवण्यासाठीही करता येईल, अशीही प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.