मुंबई: माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई करून हटवले. पोलीस बंदोबस्तात आणि पालिकेच्या पथकाची मदत घेऊन ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दर्गा बांधण्यात येत असल्याचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात नमूद केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>>माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!
माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे
हेही वाचा >>>“मुख्यमंत्रीपदी मिंधे व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’…”, ठाकरे गटाची शिंदे-फडणवीसांवर परखड टीका!
मुंबई महानगर पालिकेचे पथक गुरुवारी सकाळीच माहीम परिसरात पोहोचले. पालिकेचे अधिकारी आणि कामगारांनी पाडकामासाठी वापरण्यात येणारे मोठे हातोडे, दोरखंड आणि घमेली आणली होती. त्यामुळे माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीच्या परिसरातील चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा अधिकाऱ्यांचे पथक या कामगिरीसाठी तैनात करण्यात आले होते.