मुंबई : महात्मा गांधी मार्गावरील ‘धारावी ट्रान्झिट कॅम्प’ शाळेतील मतदान केंद्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रंगाचा अभिनव आणि कल्पकतेने वापर करून सजवलेले हे मतदान केंद्र मतदारांच्या पसंतीस पडले. धारावी पोलीस ठाण्याच्या मागे असणाऱ्या महात्मा गांधी मार्गावरील धारावी ट्रान्झिट कॅम्प शाळेत हे मतदान केंद्र होते. प्रवेशद्वारापासूनच रंगीबेरंगी पताका आणि पडद्यांची सजावट करण्यात आली होती. मतदान केंद्रात प्रवेश करताच तेथील सजावट नागरिकांना आकर्षित करीत होती.

‘तुमचे मत, तुमचा अधिकार’ अशा आशयाची रांगोळीही लक्षवेधी ठरली. ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा’ असा मजकूर लिहिलेल्या सेल्फी कक्षावरही अनेकांना सेल्फी तसेच छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही. तेथे प्रशस्त असा मतदार प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आला होता. या प्रतीक्षा कक्षात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हा कक्ष रंगीबेरंगी पडद्यांचा वापर करून एखाद्या उत्सवातील मंडपाप्रमाणे सजविण्यात आला होता.

Vacancy and infrastructural problem in health department under Buldhana Zilla Parishad
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर! पायाभूत सुविधांची वानवा, रिक्त पदांचे ग्रहण
Amravati, Agriculture Department, Agriculture Department Busts Seed Black Market , Agriculture Department Raids Nitin Krishi Kendra, Overcharging Farmers, Amravati news,
अमरावती : ८६४ रुपयांच्या कापूस बियाणे पाकिटाची १८०० ला विक्री, कृषी विभागाची कारवाई
Allegation of Sagar Chalke Prakash Morbale regarding transfers of officials Kolhapur
खासदार,आमदारांनी इचलकरंजीत अधिकार्‍यांच्या बदल्यांचा खेळखंडोबा लावला आहे; सागर चाळके, प्रकाश मोरबाळे यांचा आरोप
Mumbai Municipal Corporation, bmc, Mumbai Municipal Corporation to Resume Road Concreting Projects, Post Elections, bmc Work Orders, road construction,
मुंबई : रस्तेकामांच्या प्रक्रियेला वेग, महापालिका नव्या कामांची निविदा प्रक्रिया पावसाळ्यात पूर्ण करणार
accident on Samriddhi highway two CRPF jawan killed
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू
Who benefits from the decline in voting percentage lok sabha election 2024
मतप्रवाहाचा  मागोवा: मतदानाची टक्केवारी घटल्याचा फायदा कोणाला ?
Road works Mumbai
मुंबई: रस्त्यांची कामे ७ जूनपूर्वी पूर्ण करावी; तडजोड, दिरंगाई खपवून घेणार नाही, अतिरिक्त पालिका आयुक्त बांगर यांचा इशारा
Vacancy in Central Goods and Services Tax Department
करचोरीला आवताण! ‘सीजीएसटी’मध्ये रिक्त पदांचा आलेख वाढला

हेही वाचा…मुंबई : रांगेत तासंतास खोळंबा आणि संपर्क तुटल्याने नातेवाईक अस्वस्थ

मतदार माहिती कक्षाद्वारे मतदारांच्या विविध शंकांचे निरसन केले जात होते. तसेच धारावीतील इतरही मतदान केंद्रांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बसण्याची सुविधा, हिरकणी कक्ष, वैद्यकीय कक्ष, प्रथमोपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध होत्या.

हेही वाचा…मुंबई : सेलिब्रिटींनी मोठ्या उत्साहात केले मतदान

‘मतदान केंद्राच्या आवारात उत्साही माहोल होता. मतदान केंद्र हे रंगीबेरंगी केल्यामुळे सकारात्मक वाटत होते. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह प्रतीक्षा कक्ष होता. सर्व ठिकाणी पंखे लावले होते. मतदान प्रक्रियेबाबत व्यवस्थित माहिती देत होते, त्यामुळे काही अडचण आली नाही’, असे धारावी ट्रान्झिट कॅम्प शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलेल्या शरीफ अन्सारी यांनी सांगितले.