‘परीक्षा पे चर्चा’निमित्त स्पर्धक गोळा करण्यासाठी शिक्षकांची धावपळ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षेपूर्वी होणारा विद्यार्थ्यांशी संवादाचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी (२७ जानेवारी) होणार आहे. देशभरातील समस्त शाळांमध्ये हा कार्यक्रम दाखवणे बंधनकारक आहे. आता यानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले असून नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या योजनांवर ही स्पर्धा होणार आहे. त्याचा खर्च मुख्याध्यापकांच्या माथी मारण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिन – मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, चुलीतील धुराच्या त्रासातून मुक्त महिला – मोदींचा संवेदनशील निर्णय असे काही विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत. मात्र हा जामानिमा करताना अनेक शाळांमध्ये त्याचा खर्च मात्र मुख्याध्यापकांच्या माथी आला आहे. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे सहावे पर्व यंदा होत आहे. त्या निमित्ताने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध योजनांवर आधारित विषय देण्यात आले आहेत. केंद्राच्या शिक्षण विभागाने केंद्रीय विद्यालयांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेप्रमाणेच राज्यातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धा घेण्याच्या सूचना दिल्या तरी त्याच्या खर्चासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र तरतूद नाही. त्यासाठी अनेक भागांत मुख्याध्यापकांना त्यांच्या खिशातून ४००-५०० रुपये काढून द्यावे लागत आहेत. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी पैसे जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

शिक्षक स्पर्धकांच्या शोधात सर्व शाळांमध्ये कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे. त्यासाठी जागेपासून सर्वच गोष्टींची जुळवाजुळव करण्यासाठी धडपडणाऱ्या शाळांसमोर आणखी एक नवे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान एक हजार विद्यार्थ्यांनी चित्र काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे योजनांवर चित्र काढणारे स्पर्धक विद्यार्थी शोधण्यासाठी सध्या शिक्षकांची धावपळ सुरू आहे.

स्पर्धेसाठी विषय कोणते?
सर्जिकल स्ट्राईक, पंतप्रधानांच्या जनसेवेच्या योजना, आंतरराष्ट्रीय योगदिन – मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला – मोदींचा संवेदनशील निर्णय, करोना लसीकरणात भारत नंबर १

फक्त ‘मोदीजीं’चे छायाचित्र हवे..
हा कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय करायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर भाजपचे नाव, कमळ किंवा राजकीय नेत्यांचे छायाचित्र नको. केवळ पंतप्रधान यांचे छायाचित्र वापरण्यात यावे, अशा सूचनाही काही भागांत देण्यात आल्या आहेत.