जावेद अख्तर यांच्याविरोधात महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार

अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केली होती.

javed-akhtar-taliban
(File Photo)

रा. स्व. संघाची तालिबानशी तुलना केल्याचा आरोप

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केल्याच्या वक्तव्याप्रकरणी एका वकिलाने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीची तक्रार केली आहे.

अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केली होती. अख्तर यांनी प्रसिद्धीसाठी विनाकारण रा. स्व. संघाची बदनामी केल्याचा दावा करून अ‍ॅड्. संतोष दुबे यांनी ही तक्रार नोंदवली आहे. दुबे हे संघाचे समर्थक आहेत. संघ आणि तालिबानची तुलना होऊ शकत नाही याची पूर्ण जाणीव अख्तर यांना होती. तरीही अख्तर यांनी  हेतुत: संघाचे नाव घेतले, असा न्यायालयाने तक्रारीची सुनावणी १६ नोव्हेंबरला ठेवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Complaint against javed akhtar to the metropolitan magistrate akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या