मुंबई : सर्वाधिक २० टक्के रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू असून राज्य सरकार लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (‘नरेडको’) ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’ या मालमत्ताविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प, सागरी मार्ग असे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. पुढील वर्षी मेट्रो प्रकल्पातील काही मेट्रो मार्गिका सुरू होतील. तर मुंबई पारबंदरसह इतरही प्रकल्प सुरू होतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईत ‘नैना’ प्रकल्प सुरू असून या प्रकल्पामुळे नवी मुंबई व परिसराचा सर्वागीण विकास होणार आहे. तिसरी मुंबई म्हणून हा परिसर ओळखला जाईल. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे येथील मालमत्तांच्या किमती कमी होतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concessions soon construction sector deputy chief minister devendra fadnavis ysh
First published on: 01-10-2022 at 01:10 IST