मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी गोंधळ घालून उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली. मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळायला हवे, अशी समाजाची मागणी आहे. पण पाटील हे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घोषणाबाजीही केली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात झाली. बैठकीमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र त्यांनी उत्तरे दिली नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी र्सवकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. यावेळी ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील उपस्थित होते.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Sunetra Pawar Today Meets Vijay Shivtare
बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विजय शिवतारेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?