पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्याकडून शिंदेंना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Eknath-Shinde-CM-Oath-Ceremony-14
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तळागाळातील नेता असलेल्या शिंदे यांच्याकडे समृध्द राजकीय, विधिमंडळ व प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला मोठय़ा उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. फडणवीस हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांचा अनुभव व विद्वत्ता सरकारसाठी मोठी संपदा आहे. राज्याच्या विकासाला ते अधिक बळकटी देतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

अमित शहा यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत नवे सरकार पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आणि जनहितासाठी समर्पित भावनेतून काम करेल, असा विश्वास व्यक्त केला सावध पावले टाका : राज ठाकरे

पाहा व्हिडीओ –

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना सावधानतेने पावले टाकण्याची सूचना केली आहे. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे, ती स्वकर्तृत्वाने सिध्द कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congratulations shinde prime minister modi amit shah chief minister deputy chief minister faith careful ysh

Next Story
बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिका सकृतदर्शनी राजकीयदृष्टय़ा प्रेरित; उच्च न्यायालयाची टिप्पणी
फोटो गॅलरी