काँग्रेसची निवडणुकीची तयारी

स्वबळावर पालिका निवडणुका लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसने पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू के ली आहे.

संग्रहीत

प्रभाग रचना, मालमत्ता कर, नालेसफाई, खड्डे; सर्व विषयांवर स्पष्ट भूमिका

मुंबई : स्वबळावर पालिका निवडणुका लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसने पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू के ली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्दय़ांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट के ली. मालमत्ता कर, प्रभाग रचना, नालेसफाई, खड्डे, बेस्टच्या कर्मचाऱ्यांची देणी अशा सगळ्याच मुद्दय़ांवर जगताप यांनी भूमिका मांडली.

पालिका निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच सोमवारी भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची तयारी सुरू के ल्याचे दाखवून दिले. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते. पालिका निवडणुकीच्या तोंडावर सध्या प्रभाग रचनेवरून वाद सुरू आहेत. नियमानुसार ही प्रभाग रचना के ली जाणार असल्याचे नुकतेच निवडणूक आयोगाने स्पष्ट के ले आहे. या मुद्दय़ाबाबत बोलताना २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी केलेले प्रभागाचे सीमांकन संपूर्णत: सदोष व भाजप सरकारच्या दबावाखाली तयार करण्यात आले होते, असा आरोप जगताप यांनी के ला. तसेच ती प्रभाग रचना निवडणूक आयोगाने दिलेल्या मापदंडानुसार करण्यात यावी, अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना भाजप सरकारच्या दबावाखाली महापालिका प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली होती. एका विभागातील लोकवस्तीचा अर्धा भाग एका प्रभागामध्ये व अर्धा भाग दुसऱ्या प्रभागामध्ये करण्यात आला होता. विशिष्ट भागातील, विशिष्ट समूहातील लोकांना जाणीवपूर्वक वेगळे करण्यात आले आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी मुंबई काँग्रेसने प्रा. जनार्दन चांदुरकर यांच्या समितीचे गठन केले होते. या समितीने सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल तयार केला होता. त्यात २०१६ साली केलेले सीमांकन हे सदोष आणि चुकीच्या पद्धतीने केल्याचे नमूद करण्यात आले आहे, असा दावा जगताप यांनी केला.

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव हा वर्षभरासाठी स्थगित न करता हा प्रस्ताव पुढील पाच वर्षांसाठी २०२५ पर्यंत स्थगित करण्यात यावा, अशी मागणीही जगताप यांनी यावेळी के ली. बेस्टच्या कर्मचाऱ्यांबाबत त्यांनी भू्मिका स्पष्ट के ली. मागील दोन ते चार वर्षांमध्ये जे बेस्टचे कर्मचारी निवृत्त झाले, त्यांची ग्रॅच्युईटीची रक्कम अजून त्यांना मिळालेली नाही.  कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी पालिका प्रशासनाने बेस्टला ४०६ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे ठरवले आहे. पण प्रशासनाने हा निधी कर्ज म्हणून नाही, तर अनुदान म्हणून द्यावा, अशीही मागणी त्यांनी के ली.

भाई जगताप यांनी यावेळी नालेसफाईच्या दाव्यांचाही समाचार घेतला. मुंबईमध्ये शंभर टक्के नालेसफाई झाली असल्याचे सतत सांगितले जाते पण आम्ही  मुंबईतील अनेक नाल्यांची पाहणी केली, त्यावेळेस अनेक ठिकाणी २५ टक्के नालेसफाई झाल्याचेसुद्धा दिसले नाही. नालेसफाई झाली नाही, तर ते १०० कोटी रुपये कुठे व कसे खर्च केले आणि त्यातून काय मिळाले ते महापालिकेने सांगावे, असे आव्हानही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी के ली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress election preparations mumbai ssh

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा