मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होताच विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा केली.

विरोधकांचा संयुक्त उमेदवार उभा करण्याची कल्पना मागेही मांडण्यात आली होती. ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने काँग्रेसने पुढाकार घेतला. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून मुंबईत तळ ठोकून असलेल्या खरगे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते. ‘काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार आपण पवारांची आज भेट घेतली. उद्या मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर द्रमुकच्या प्रमुखांना भेटणार आहे. लवकरच दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली जाईल, असे खरगे यांनी सांगितले.

BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Ashok Chavan, Voters called
अशोक चव्हाणांच्या मंत्रिपदासाठी मतदारांना भावनिक साद!
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप

लवकरच विरोधी नेते दिल्लीत एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करतील, असे पवार यांनी बैठकीनंतर सांगितले.