आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड तर्क-वितर्कांना काहीसा ब्रेक मिळाला. एनसीबीनं आर्यन खान प्रकरणी केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने टीका करत आहेत. वारंवार पत्रकार परिषदा घेऊन नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. खुद्द एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं असताना आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ शेअर करून मोठा दावा केला आहे. तसेच, आपण ही बाब वर्षभरापूर्वीच सांगितली होती, असं देखील ते म्हणाले आहेत.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांचाच एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. २४ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओसोबत त्यांनी एक लिहिलेल्या संदेशात ते म्हणतात, “मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे. (समीर वानखेडेंना) झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर ते आता स्पष्टच झालं आहे”.

congress mla yashomati thakur criticized bjp
“देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू, अशा पद्धतीची दडपशाही…” आमदार यशोमती ठाकूर यांचा भाजपवर आरोप
Mallikarjun Kharge criticizes PM Narendra Modi on Ram Mandir Pranpratistha Ceremony
“मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

काय आहे या व्हिडीओमध्ये?

सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वी म्हणजेच २४ सप्टेंबर २०२० रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ते एनसीबीवर आरोप करताना दिसत आहेत. “बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन, चंदन तस्करी आणि गोवा कनेक्शनमधील भाजपाच्या सहभागाची चौकशी जाणूनबुजून केली जात नाहीये, त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय? एनसीबी ५९ ग्रॅम गांजाच्या जप्तीमधून मोठा वाद उभा करतंय. पण कर्नाटकमध्ये चंद्रकांत चौहान नावाच्या भाजपा कार्यकर्त्याकडे १२०० किलो गांजा सापडला. पण एनसीबीकडे तिथे जाण्यासाठी वेळ नाहीये”, असं या व्हिडीओमध्ये सचिन सावंत म्हणत आहेत.

“व्हॉट्सअॅप चॅट्स चौकशीसाठी चालत असतील तर…”

“व्हॉट्सअॅप चॅट जेव्हा चौकशीसाठी आधार मानले जातात, तर मग कंगना रनौतच्या व्हिडीओ मेसेजेसची चौकशी का करण्यात आली नाही? ती देखील बॉलिवुडमधून आहे. मग तिला चौकशीसाठी का बोलावण्यात आलं नाही? या प्रश्नांची उत्तरं एनसीबीला द्यावी लागतील”, असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

फडणवीस चित्रपटाच्या पोस्ट अनावरणाला कसे गेले?

“कर्नाटक सँडलवूड ड्रग्ज रॅकेटमधल्या मुख्य आरोपी रागिनी द्विवेदी भाजपाच्या स्टार प्रचारक होत्या. १२ लोकांवर आरोप ठेवण्यात आले. त्यापैकी आदित्य अलवा हा विवेक ओबेरॉयचा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय भाजपाचा गुजरातमधला स्टार प्रचारक आहे. मोदींच्या बायोपिकचा तो सहनिर्माता आहे. तो संदीप सिंगचा पार्टनर आहे. त्यांची एकमेव कंपनी आहे जिला गुजरात सरकारने बोलावलं आणि त्यांच्यासोबत १७७ कोटींचा एमओयू केला. फडणवीस सीएम असताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण कसं केलं? राज्य सरकारकडून सीबीआयला विनंती करण्यात आली होती की कर्नाटकमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करावी. पण त्याची काहीही चौकशी करण्यात आलेली नाही”, असा आरोपही सचिन सावंत यांनी व्हिडीओमध्ये केला आहे.