मुंबई : विधानसभा निवडणुकीत उलेमांनी पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसवर ‘व्होट जिहाद’चा आरोप करणाऱ्या भाजपला लोकसभा तसेच आसाम आणि गुजरातमधील निवडणुकांमध्ये उलेमा, मौलवींनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता मग ते ‘व्होट जिहाद’ नव्हते का, असा थेट सवाल अ. भा. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना शनिवारी केला. नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ‘शहरी नक्षलवादा’ची उपमा दिली जाते पण २०१२ ते २०१४ या काळात याच कार्यकर्त्यांनी भाजपला मदत केली होती तेव्हा ते कसे चालले, अशीही विचारणा त्यांनी भाजपला केली.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका, उलेमांच्या पाठिंब्यावरून काँग्रेसवर होत असलेली टीका, नागरी संघटनांवर होणारे आरोप, भाजपची रेवडी संस्कृती, पक्षावर होणारे आरोप, हरियाणातील पराभव अशा विविध मुद्द्यांवर खेरा यांनी परखडपणे भाष्य केले. उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे अन्य नेतेमंडळी काहूर माजवत आहेत. पण गुजरात आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये उलेमा आणि मौलवींनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मुस्लिमांनी भाजपला पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेशात पसमंद मुस्लिमांचा पाठिंबा घेण्यात आला. भाजप परिवारातील नेते इंद्रिस यांनी मुस्लीम समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. आसाममध्ये अलीकडेच मदरशांमधील ५०० उलेमांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला तर ‘व्होट जिहाद’ मग याच मंडळींनी निवडणुकीत पाठिंबा दिला ते भाजपला कसे चालते, असा सवाल पवन खेरा यांनी केला.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
NCP Sharad Pawar faction state president MLA Jayant Patil has no statement regarding party defection
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या मौनाचा अर्थ काय?
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ

हेही वाचा >>> राज ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर आधी…आठवलेंनी सांगितला भविष्यातला प्लॅन…

नागरी संघटनांची तेव्हा भाजपला मदत

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नागरी संघटनांच्या (सिव्हिल सोसायटी) कार्यकर्त्यांवर शहरी नक्षलवादाचा शिक्का मारण्यात आला. २०१२ ते २०१४ या काळात याच नागरी संघटनांनी भाजपला मदत केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला रा. स्व. संघाने सारी रसद पुरविली होती हे स्पष्ट झाले होते. तेव्हा नागरी संघटना या शहरी नक्षलवादी नव्हत्या. भाजपला पाठिंबा देणाऱ्या नागरी संघटनांबद्दल फडणवीस का बोलले नाहीत ? ‘व्होट जिहाद’ आणि शहरी नक्षलवाद यावरून भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही खेरा यांनी केला.

फडणवीस यांच्या जाहिरातींमधून शहांचे छायाचित्र गायब देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र कुठेच दिसत नाही. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातींमध्ये अमित शहा यांची छबी ठळकपणे झळकत आहे. शिंदे यांना शहा एवढे प्रिय आहेत मग फडणवीस यांच्या जाहिरातींमध्ये शहा कसे नाहीत, असा सवालही खेरा यांनी केला. तसेच मोदी सरकारच्या विरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याआधी कदाचित महाराष्ट्रातून ठिणगी पडू शकते, असा टोलाही लगावला.

धर्माला हाताशी धरून महाविकास आघाडीचे राजकारण – फडणवीस

नागपूर : शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष धर्माचा वापर करून ‘व्होट जिहाद’ करत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला १७ मागण्यांचे पत्र दिले आहे. यात दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय दंगलीतील मुस्लीम आरोपींवरील खटले परत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी त्यात आहे. देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना तुरुंगातून सोडण्याची मागणीसुद्धा काँग्रेसने मान्य केली आहे. म्हणजे एक प्रकारे दहशतवादी कृत्याला काँग्रेसचे समर्थन आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने सावध राहून मतदान करण्याची वेळ आली आहे. नोमानींची दुसरी चित्रफीत तर आणखी भयंकर आहे. त्यात काही लोकांनी लोकसभेत मुस्लीम समाजातील ज्या व्यक्तीने भाजपला मतदान केले त्यांना शोधून काढा आणि त्यांचा दाणापाणी बंद करा, सामाजिक बंदी घाला असे आवाहन केले आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्द बोलत नाहीत. एका धर्माला हाताशी धरून ज्या पद्धतीने महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला आम्ही उत्तर देऊ. मुस्लीम समाजाला धमकावणे म्हणजे एक प्रकारचा गुन्हा आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’ ही जी घोषणा केली ती योग्यच आहे. महाविकास आघाडी मुस्लीम समाजाला जवळ करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Story img Loader