वसंत डावखरे पुन्हा रिंगणात

९९२ पासून आतापर्यंत लागोपाठ चार वेळा या मतदारसंघाचे डावखरे हे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

  वसंत डावखरे

सेनेकडून उमेदवाराचा शोध

विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाची निवडणूक विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे लागोपाठ पाचव्यांदा लढविणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे एक हजारपेक्षा जास्त मतदार आहेत. १९९२ पासून आतापर्यंत लागोपाठ चार वेळा या मतदारसंघाचे डावखरे हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ठाणे मतदारसंघातील निवडणुकीचा अलीकडेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला व डावखरे यांना निवडणूक लढविण्याकरिता तयारीला लागण्याच्या सूचना पक्षाने केल्या आहेत. पक्षाच्या आदेशावरून डावखरे यांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे मतदारसंघात शिवसेना-भाजपचे संख्याबळ जास्त आहे. मते मिळविण्याचा ‘चमत्कार’ करण्यात माहिर असणारे डावखरे रिंगणात उतरणार असल्याने शिवसेनेच्या इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. १९९८च्या निवडणुकीत युतीचे संख्याबळ जास्त असतानाही डावखरे यांनी विजयश्री खेचून आणली होती. यंदाही तसाच चमत्कार करण्याची डावखरे यांची योजना आहे. १२५ मतदार असलेल्या हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

अनंत तरे यांच्या नावाची चर्चा

शिवसेनेत उमेदवारीसाठी अनंत तरे यांच्या नावाची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांना विधान परिषदेचे आश्वासन देण्यात आले होते. डावखरे रिंगणात असल्याने तेवढाच तोडीचा उमेदवार शिवसेनेकडून रिंगणात उतरविला जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress leader vasant davkhare applying for maharashtra legislative assembly election