मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसच्याच उंडाळकरांचा बंडाचा पवित्रा

दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या मतदार संघातील काँग्रेसचे पारंपारीक उमेदवार आमदार विलासकाका पाटील उंडाळकर बंड करण्याच्या तयारीत आहेत.

दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या मतदार संघातील काँग्रेसचे पारंपारीक उमेदवार आमदार विलासकाका पाटील उंडाळकर बंड करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे उंडाळकर यांनी रविवारी मुंबई येथे जाहीर केले. यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसत आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोडण्यासाठी विद्यमान काँग्रेस आमदार विलासकाका पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला असून, या मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवणार यावर ते ठाम आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress man to contest election against cm chavan