मुंबई : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. सदस्य नोंदणीच्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी या पुढे दररोज एक लाख सदस्य नोंदणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. मुंबईत मरिन लाइन्स येथील इस्लाम जिमखान्यात काँग्रेसचे प्रभारी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष नसिम खान, चंद्रकांत हंडोरे, आमदार कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, बसवराज पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसला मार्चअखेपर्यंत एक कोटी डिजिटल सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. परंतु मार्च महिना संपायला एक आठवडा उरला असताना दहा लाख सदस्य नोंदणीचा टप्पादेखील पूर्ण झालेला नाही, असे निदर्शनास आल्यानंतर प्रभारी पाटील यांनी सदस्य नोंदणी संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या तुलनेत सदस्य नोंदणीत तेलंगणा आणि कर्नाटकमधील काँग्रेसची कामगिरी चांगली आहे, मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह चांगला नसल्याचे खडे बोलही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावल्याचे समजते.

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना