पेंग्विनच्या देखभालीसाठी होणारा खर्च हा कायमच वादाचा मुद्दा राहिला आहे. पेंग्विन देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत. तीन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यात वैद्यकीय बाबींचाही समावेश आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना खासगी डॉक्टरांच्या नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. करोनाकाळात पालिका अनावश्यक खर्च करत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. तसेच निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी के ली आहे.
पेंग्विनबाबत तडजोड नाही : महापौर
पेंग्विन हे उद्यानाचं आकर्षण आहे.पेंग्विन वेगळ्या वातावरणात राहतात. त्यांची काळजी घेण्यास तडजोड केल्यास त्यांच्या जिवाशी खेळण्या सारखे होईल. तेव्हा कोणतीही तडजोड होणार नाही. विरोधकांना खर्चावर आक्षेप असेल तर त्याची माहिती घेऊ. परंतु प्राणी संग्रहालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रि या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.