राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून रोज नव्याने एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकीकडे किरीट सोमय्या सत्ताधारी नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत असताना दुसरीकडे संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत काही खळबळजनक आरोप केले आहेत. आरोपांच्या या मालिकेत आता काँग्रेसकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओत काय आहे?

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असणारे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासोबत हस्तांदोलन करत असल्याचं दिसत आहे. प्रसाद पुरोहित आल्याचं दिसल्यानंतर फडणवीस जागेवरुन उभं राहून त्यांना हस्तांदोलन करत नमस्कार करतात.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना ‘बहुत याराना लगता है’ अशी कॅप्शन दिली असून शंका व्यक्त करणारी इमोजी दिली आहे.

सचिन सावंत यांचं म्हणणं काय?

सचिन सावंत यांनी एबीपीला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “हा एक युएपीएचा आरोपी आहे. अत्यंत गंभीर घटनेत सहभागी असलेल्या आरोपीसोबत इतकी घनिष्टता असल्याचं दिसत आहे. भाजपाने ज्याप्रकारे साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देत तिकीट दिलं त्यामुळे भाजपाचे या प्रकरणातील संबंध किती मोठ्या प्रमाणात होते हे वेळोवेळी दिसत असून या भेटीतून हे अधोरेखित होत आहे. यांच्यात खूपच मैत्री असल्याचं दिसत आहे”.

प्रसाद लाड म्हणाले मला अभिमान

प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील या व्हिडीओबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, “माझ्या मुलीच्या लग्नात सचिन सावंत आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. अशाप्रकारे लग्नसोहळ्यात विकृतीची बुद्धी दाखवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्नल पुरोहित माझे मित्र असून मला त्यांचा अभिमानही आहे. कोर्टात खटला सुरु असताना ते पुन्हा लष्करात रुजू झाले आहेत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी म्हणत नाहीत. अशाप्रकारे विकृत बुद्धीने ट्वीट करु नये. मित्र म्हणून मी त्यांना बोलावलं होतं. पण अशाप्रकारे लग्नात कोण येतं त्यांचे फोटो, व्हिडीओ काढणं ही विकृती आहे”.

“प्रसाद पुरोहित माझे मित्र असून लष्करात आहे. देशसेवा करत आहेत त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे. देशसेवेसाठी झोकून देणाऱ्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि तो कोणत्या भावनेने केला हेदेखील देशातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला अशा गोष्टींची चिंता नाही. ते माझे मित्र आहेत. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्यावर प्रतिक्रिया देईन,” असंही ते म्हणाले.