विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. या भेटीत नाना पटोले फडणवीसांसोबत विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये गोंधळ पाहायला मिळत असला तरी आता विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलीय. त्यामुळे काँग्रेसने बिनविरोध निवडणुकींसाठी पुढाकार घेतलाय. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.

निवडणूक आणि निकाल कधी?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या ६ जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आलाय.

हेही वाचा : विधान परिषद पोटनिवडणुकीत गुप्त मतदानामुळे सत्ताधाऱ्यांची कसोटी

कोणत्या ६ जागांसाठी निवडणूक होणार?

भाई जगताप, काँग्रेस, मुंबई
रामदास कदम, शिवसेना, मुंबई
सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर
गिरिश व्यास, भाजप, नागपूर
अमरीश पटेल , भाजप, धुळे-नंदुरबार
गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना अकोला, बुलढाणा, वाशिम

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress state president nana patole meet devendra fadnavis amid assembly bypolls pbs
First published on: 18-11-2021 at 13:10 IST