महागाईविरोधात काँग्रेसचा जेलभरोचा इशारा

दादर येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई : वाढत्या महागाईचा प्रशद्ब्रा हाती घेऊन केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राज्यात नोव्हेंबरमध्ये जेलभरोसारखे तीव्र आंदोलन करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी के ली.

दादर येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली आहे. मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत.

महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा साजरी करणे मुश्कील झाले आहे.

काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली, पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress warns against inflation akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या