मुंबई : व्यावसायिक शत्रुत्वातून ‘बॉम्बे डाईंग’चे तत्कालीन प्रमुख नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्याची आरोपीने मागणी केली होती. सीबीआयने गुरुवारी त्याला विरोध केला. सरकारी पक्षाच्या साक्षीदाराला उलटतपासणीसाठी पाचारण करण्याचा आरोपीला अधिकार नसल्याचा दावाही सीबीआयने केला. १९८८-८९ मधील या प्रकरणातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज केला आहे. त्यात त्याने अंबानी यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. न्यायालयानेही त्याच्या अर्जाची दखल घेऊन सीबीआयला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.  सीबीआयने गुरुवारी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानुसार, साक्षीदारांची तपासणी करणे किंवा त्यांना वगळणे तपास यंत्रणेचा अधिकार आहे, असे सांगण्यात आल़े

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
Case of Allegedly Inciting Speech Demand to file case against Nitesh Rane and Geeta Jain
कथित प्रक्षोभक भाषण केल्याचे प्रकरण : नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा