तळीये पुनर्वसन प्रकल्प :

Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु

मुंबई : रायगड, महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाने बांधकामासाठी निविदा जारी केली आहे. आता मार्चमध्ये २६३ घरांच्या कामाला कोकण मंडळाकडून सुरुवात करण्यात येणार आहे. प्राधान्याने मूळ ६३ विस्थापितांना शक्य तितक्या लवकर घरे देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या ६३ घरांचे काम वेगात पूर्ण करून मेमध्ये या घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला.

 जुलैमध्ये तळीये गावातील कोंढाळकरवाडी येथे दरड कोसळली. यात ८० हून अधिक जणांचा बळी गेला. ६३ कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची, त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि नैसर्गिक संकटाचा सामना करू शकणारी अशी घरे बांधण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली. म्हाडाच्या कोकण मंडळाने यासाठी आराखडा तयार केला तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादन केले. या आराखडय़ानुसार कोंढारकरवाडीसह आजूबाजूच्या वाडय़ाचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथे ६३ घरांऐवजी २६३ घरे बांधण्यात येणार आहे.  प्रत्येक कुटुबाचे ३००० चौ फुट जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. या जागेतच ६०० चौ फुटाचे प्री फॅब पध्दतीचे घर बांधून देण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ६५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या पुनर्वसन प्रकल्पास दिवाळीत सुरुवात होईल असे जाहीर करण्यात आले. मात्र काम सुरू होऊ शकले नाही. पुनर्वसन रखडल्याने विस्थापितांमध्ये नाराजी होती. पण आता मात्र या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. गेल्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत घरांच्या कामासाठी निविदा मागवली आहे. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून मार्चअखेरीस घरांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.