बांधकाम मजुराचा तीन मुलांवर विषप्रयोग, एकाचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून तो बेरोजगार होता.

प्रतिनिधिक छायाचित्र
मुंबई : दारुचे व्यसन आणि त्यातून पत्नीशी होणाऱ्या भांडणामुळे एका बांधकाम मजुराने आपल्या तीन मुलांवर विषप्रयोग के ला. यात एका मुलाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. ही घटना मानखुर्दमध्ये घडली.

मोहम्मद अली नौशात अली अन्सारी (वय ३०) पत्नी आणि तीन मुलांसह मानखुर्दच्या अण्णा भाऊ साठेनगर येथे राहात होता. गेल्या काही महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्यात त्याला दारूचे व्यसन जडले. त्यावरून पत्नीशी सतत वाद होत असत. २५ जून रोजी अन्सारीने आइस्क्रीममधून विष कालवून मुलांना दिले. मुलांना त्रास होऊ लागल्याने पत्नीने अन्सारीला त्याबाबत विचारले असता त्याने विषप्रयोग केल्याचे कबूल के ले. तीनही मुलांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी आलिशान (वय ५) या मुलाचा मृत्यू झाला. तर अरमान (अडीच वर्षे) आणि अलिना (७) या दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत. मानखुर्द पोलिसांनी अन्सारीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Construction worker poisoned three children one died akp