मुंबई  : इंधन दरवाढ तसेच महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या वेळी पक्षाचे सरचिटणीस के . सी. वेणूगोपाळ यांच्या समोरच युवक काँग्रेसच्या आजी-माजी अध्यक्षांमध्ये वादावादी झाली.

महागाईच्या विरोधात दादरमधील राजगृह ते चैत्यभूमी अशी पदयात्रा मुंबई काँग्रेसने आयोजित के ली होती. पक्षाचे संघटन सरचिटणीस के . सी. वेणूगोपाळ, राज्याचे प्रभारी एच. के . पाटील हे या पदयात्रेत सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह मुंबईतील पक्षाचे नेते  उपस्थित होते. राजगृह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानात फक्त १० जणांनाच आत जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दिकी हे आत जाण्याचा प्रयत्न करू लागले असता त्यांना रोखण्यात आले. यावरून सिद्दिकी यांनी आपल्याला का रोखण्यात येत आहे, असा सवाल के ला. यावरून  सिद्दिकी आणि सूरज ठाकू र यांच्यात वादावादी झाली.

मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष व आमदार या नात्याने आपण राजगृहमध्ये आत जात होतो. तेव्हा रोखण्यात आले. परंतु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दूरध्वनीवर विचारणा के ली असता कोणालाही रोखणार नाही, असे त्यांनी स्पष्ट के ले. काही जणांनी जाणूनबुजून आपल्याला रोखल्याचा आरोप सिद्दिकी यांनी केला.

पदयात्रेनंतर झालेल्या सभेत वेणूगोपाळ आणि पाटील यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका के ली.