मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून फाइल्स तपासल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. सोमय्या यांनी माहिती अधिकारात फाइल्स तपासण्याची परवानगी घेतली नसेल, तर त्यांच्यावर शासकीय कार्यालयात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याबद्दल आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.  सोमय्या यांनी सोमवारी नगर विकास विभागातील कक्ष क्रमांक ११६ मध्ये  काही फाइल्स तपासल्या. त्या वेळी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स बघत होते. सोमय्या यांनी कोणत्या फाइल्स कोणत्या अधिकारात तपासल्या, त्यासाठी  परवानगी दिली होती का, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता का, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत ते का बसले होते, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सावंत यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over kirit somaiya checking files on officer s chair zws
First published on: 25-01-2022 at 01:08 IST