पोलिस निरीक्षकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग – युनिट ३ चे प्रमुख अरविंद सावंत यांचा मुलगा तेजस सावंत (वय २१ वर्षे) याने, सावंत यांच्या सर्विस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग – युनिट ३ चे प्रमुख अरविंद सावंत यांचा मुलगा तेजस सावंत (वय २१ वर्षे) याने, सावंत यांच्या सर्विस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आज (बुधवार) सकाळी सात वाजता विक्रोळी येथे सावंत यांच्या राहत्या घरी हा प्रकार घडला. एक राऊंड फायरिंगनंतर तेजसला जवळच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येप्रकरणी तेजसच्या खोलीतून कुठल्याही प्रकारची चिठ्ठी मिळालेली नाही. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी, सावंत हे काही कारणावरून तेजसला ओरडले होते आणि त्यानंतर हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अरविंद सावंत यापूर्वी एटीएस मध्ये कार्यरत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cop son made suicide