महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एकाच दिवसात ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झालाय. त्यामुळे मुंबई पोलीस दलात चिंतेचं वातावरण आहे. शुक्रवारी (७ जानेवारी) समोर आलेल्या या नव्या आकडेवारीसह आता मुंबई पोलीस दलातील एकूण करोना बाधितांची संख्या ९ हजार ६५७ वर पोहचली आहे. यात १२३ जणांच्या मृत्यूचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या करोना बाधितांपैकी एकूण ४०९ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत. मुंबईत दररोज आढळणाऱ्या करोना रूग्णांची संख्या २० हजारापेक्षा अधिक झाल्यानंतर पोलीस दलातील संसर्गाची ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे ही काळजीची बाब असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा : “कुणीही आत्मसंतुष्ट होऊ नका, पुढच्या दोन आठवड्यात…”, करोनाबाबत दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा गंभीर इशारा!

करोना काळात नियमांची अंमलबजावणी करण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असतात. त्यातूनच ते संसर्गाचा बळी ठरल्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona covid 19 omicron infection in mumbai police 93 infected in single day pbs
First published on: 08-01-2022 at 17:10 IST