गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रीच कॅण्डीमधील आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती अशी माहिती मिळत आहे.

न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लता मंगेशकरांना आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वय पाहता त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उषा मंगेशकर यांनी त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचं सांगितलं होतं.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Sunita Kejriwal
‘केजरीवालांना आशीर्वाद द्या’; पत्नी सुनीता यांची व्हॉट्स अ‍ॅप मोहीम

करोना चाचण्यांना कात्री ; आता रुग्णसंपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींनाच बंधनकारक

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “लता मंगेशकर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासणार नाही. त्या आपल्या घरी विलगीकरणात किंवा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात थांबून उपचार घेऊ शकतात”.

तिसऱ्या लाटेत तरुण वर्ग सर्वाधिक बाधित

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबासोबत ९२ वा वाढदिवस साजरा केला. लता मंगेशकर यांनी खासगीत मोजक्या लोकांसोबत वाढदिवस साजरा केला असला तरी सोशल मीडियावर मात्र जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीट करत लता मंगेशकरांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली होती.

लता मंगेशकर यांनी आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत तब्बल एक हजाराहून अधिक हिंदी गाणी गायली आहेत. याशिवाय मराठी आणि इतर भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केली आहेत. यश चोप्रा यांचा २००४ मध्ये आलेल्या ‘वीर-झारा’ चित्रपटात त्यांनी शेवटचं गाणं गायलं होतं. ३० मार्च २०२१ ला हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘सौगंध मुधे इस मिट्टी की’ हे गाणं भारतीय लष्कराला समर्पित करण्यात आलं होतं.

दरम्यान लता मंगेशकर यांनी पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके याशिवाय राष्ट्रीय तसंच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.