मुंबई : चीन, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया या देशांमधून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली असून गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई विमानतळावरील चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. मुंबई विमानतळावर दररोज ६०० हून अधिक प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : समुद्र दूषित करणाऱ्या नाल्यांचे प्रवाह वळवणार; महानगरपालिका तयार करणार सविस्तर प्रकल्प अहवाल

pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
mumbai airport gold smuggling
मुंबई विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनसार १ जानेवारीपासून देशातील प्रत्येक विमानतळावर चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूर या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या देशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर विमानतळावर उतरणाऱ्या प्रवशांपैकी दोन टक्के प्रवाशांची स्वैरचाचणीही करण्यात येत आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून मुंबई विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिका: पहिल्या टप्प्यात मोरबे – करंजाडेदरम्यानच्या मार्गिकेचे काम हाती घेणार

मुंबई विमानतळावर १ जानेवारीपूर्वी करण्यात येणाऱ्या स्वैरचाचणीमध्ये ३०० ते ४०० प्रवाशांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र चीन, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूर या सहा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मुंबई विमानतळावर सध्या दररोज ५५० ते ६०० करोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे साधारणपणे २०० ते २५० चाचण्या होत आहेत. चाचण्यांमध्ये वाढ होऊनही करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण शून्य असल्याने सध्या तरी दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत राज्यातील विमानतळांवर उतरलेल्या प्रवाशांमधून फक्त चार प्रवाशांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे.