मुंबई : करोना काळात टाळेबंदीमध्ये गरजू लोकांना आर्थिक मदत करणारा, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सहकार्य करणारा अभिनेता सोनू सूदच्या मालमत्तेची पाहणी प्राप्तिकर विभागाने सुरू के ली आहे. बुधवारी सोनू सूदच्या कार्यालयासह त्याच्याशी संबंधित सहा कंपन्यांची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी के ल्याचे समजते. सोनू सूदच्या कार्यालयात आर्थिक देवाणघेवाणीत अफरातफर झाल्याचे समजल्यामुळे ही पाहणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या कार्यालयात पोहोचले.  त्याच्या कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे वा अन्य गोष्टी अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नाहीत. सोनू सूदशी संबंधित अन्य सहा कं पन्यांचीही  विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. सोनू सूदवर सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई ही राजकीय सूडबुध्दीने के ली जात असल्याची चर्चा मात्र समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.