scorecardresearch

रुग्णवाढीचा आलेख स्थिर

करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख मागील काही दिवस पाच ते सात हजारांदरम्यान स्थिरावला आहे.

Coronavirus-1

मुंबई  : मुंबईत करोनाच्या रुग्णवाढीचा आलेख काही प्रमाणात स्थिर असल्याचे आढळले आहे. शहरात बुधवारी ६ हजार ३२ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून १२ जणांचा मृत्यू झाला.

करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख मागील काही दिवस पाच ते सात हजारांदरम्यान स्थिरावला आहे. शहरात बुधवारी ६ हजार ३२ रुग्ण आढळले असून यातील ५३८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर १०३ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला आहे. करोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत दुपटीहून जास्त असून बुधवारी शहरात १८ हजार २४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. परिणामी शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून सध्या ३१ हजार ८५६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

लोकसत्ता टीमलोकसत्ता टीमलोकसत्ता टीमलोकसत्ता टीमलोकसत्ता टीमलोकसत्ता टीमलोकसत्ता टीम

४३,६९७ नवे करोना रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या ४३,६९७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४६,५९१ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४,७०८ आहे.

राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे २१४ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या २०७४ झाली आहे. त्यापैकी १०९१ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत नवी मुंबई १२५५, कल्याण-डोंबिवली ६७५, मीरा-भाईंदर ३८४, पनवेल ९०२, रायगड ८९३, नाशिक १९४६, पुणे २६०८, पुणे शहर ६५१३, पिंपरी चिंचवड ३३७०, सातारा येथे  १३४४ नव्या रुग्णांची नोंद झाली.

जिल्ह्यात ३,८६५ नवे बाधित

ठाणे ठाणे जिल्ह्यात बुधवारी ३ हजार ८६५ करोना रुग्ण आढळून आले. तर, आठ रुग्णांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील ३ हजार ८६५ करोना रुग्णांपैकी ठाणे एक हजार, नवी मुंबई १ हजार १२६, कल्याण – डोंबिवली ६४८, मीरा-भाईंदर ३९२, ठाणे ग्रामीण २६५, उल्हासनगर १६७, अंबरनाथ १०७, बदलापूर १०७ आणि भिवंडीमध्ये ५३ रुग्ण आढळून आले. तर आठ मृतांपैकी कल्याण-डोंबिवली चार, नवी मुंबई दोन तर ठाणे आणि मीरा-भाईंदर मध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona patient corona patient graph corona death patient akp

ताज्या बातम्या