मुंबई: बुधवारी शहरात ३३० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७८ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती मुंबई पालिके कडून देण्यात आली.

बुधवारी एकू ण करोनाबाधितांचा आकडा ७ लाख ५६ हजार ७७२ एवढा झाला आहे. तर करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ३४ हजार ५९० एवढी झाली आहे. मुंबईत करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के  आहे. सध्या ३ हजार ३८६ सक्रि य रुग्ण आहेत. बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकू ण मृतांचा आकडाही १६ हजार २५९ पर्यंत पोहोचला आहे. बुधवारी मृत झालेल्या करोना रुग्णांमध्ये पाचही पुरुष रुग्ण होते. यातील ३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तीन जणांचे वय ६० वर्षांवर होते, तर उर्वरित दोघांचे वय चाळीस वर्षांपेक्षा कमी होते. सध्या प्रतिबंधित इमारतींची संख्याही कमी झाली असून ३० पर्यंत खाली आली आहे. तर करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १ हजार ६७९ जणांचा शोध घेण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात १८८  रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी १८८ करोना रुग्ण आढळून आले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १८८ करोना रुग्णांपैकी ठाणे ५३, कल्याण-डोंबिवली ३६, नवी मुंबई ३६, मीरा भाईंदर २४, ठाणे ग्रामीण १३, अंबरनाथ नऊ, भिवंडी आठ, उल्हासनगर सहा आणि बदलापूरमध्ये तीन रुग्ण आढळून आले.