तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका!

निर्बंध शिथिल करण्यात आल्याने लोक मोठ्याप्रमाणात रस्त्यावर फिरत असून सर्वत्र गर्दी दिसत आहे.

Uddhav-Thackeray-2
संग्रहीत छायाचित्र

मुख्यमंत्र्यांचा भाजपला सूचक इशारा; जनआशीर्वाद यात्रेबद्दल मंत्रिमंडळात चिंता

मुंबई : नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्र म आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक बघता चिंता वाटते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे  केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपला फटकारले आहे. भाजपच्या या यात्रांमुळेच करोना वाढण्याची भीती मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी व्यक्त करण्यात आली.

विरोधकांना जे  राजकारण करायचे ते करू द्या, तो करोना वाढविणारा पक्ष आहे, पण किमान महाविकास आघाडीच्या  घटक पक्षांनी तरी खबरदारी घेऊन पुढील दोन-तीन महिने गर्दीचे राजकीय, धार्मिक कार्यक्रम टाळावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना के ली.

भाजपतर्फे  राज्यभरात केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. मुंबईत केंद्रीय लघु उद्योग विकासमंत्री नारायण राणे यांची उद्यापासून दोन दिवसांची जनआशीर्वाद  यात्रा सुरू होत आहे. राज्यात राजकीय सभा, मेळाव्यांना बंदी असताना भाजपच्या यात्रेला परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही काही मंत्र्यांनी केला.

मात्र निर्बंध शिथिल करण्यात आल्याने लोक मोठ्याप्रमाणात रस्त्यावर फिरत असून सर्वत्र गर्दी दिसत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सप्टेंबर ऑक्टोबरदरम्यान राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा करोना नियंत्रणविषयक तज्ज्ञांच्या गटाने दिल्याकडे आरोग्य विभागाने लक्ष वेधले.

राजकीय, धार्मिक, सामाजिक व इतर कार्यक्र म आयोजित करून सामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा काही जणांच्या वर्तणुकीची चिंता वाटते, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी  भाजपला लगावला आहे.

शिवसैनिकांचा राणे यांना विरोध

जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दादरमधील शिवाजी पार्क मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत. राणे यांच्यासारख्या नेत्याला शिवसेनाप्रमुखांच्या समाधीस्थळी जाण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगत शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिक राणे यांना समाधीस्थळी जाऊ देणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

‘प्रत्येक पाऊल सावधपणे’

राज्यातून करोनाची लाट संपलेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलीकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजी देखील महत्त्वाची आहे. यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे असून, आपले सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरू राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे के ले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient chief minister uddhav thackeray bjp akp