scorecardresearch

मुंबईत २४ तासांत ३५६८ रुग्ण

शनिवारी मुंबईत ३ हजार ५६८ रुग्ण आढळले असून जानेवारीत पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : आठवड्याभरापासून मुंबईतील करोना रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली येत आहे. १५ जानेवारीला मुंबईत १० हजार रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र ही संख्या ८ ते ५ हजारांवर आली आणि शनिवारी यात आणखी मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईत ३ हजार ५६८ रुग्ण आढळले असून जानेवारीत पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण आढळले आहेत.

 १ जानेवारीला ६३४७ रुग्ण आढळले आणि पाहता पाहता हा आकडा अवघ्या पाच दिवसांत २० हजारांवर पोहोचला. ६,७,८ जानेवारीला २० हजाराच्या वर रुग्ण आढळले.  शनिवारी ४९ हजार ८९५ चाचण्या झाल्या असून यात ३ हजार ५६८ रुग्ण आढळले आहेत.  शनिवारी मुंबईत १० मृत्यू झाले असून मुंबईतील एकूण करोनाबळींची संख्या १६ हजार ५२२ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात २,७४३  रुग्ण

 ठाणे जिल्ह्यात शनिवारी २ हजार ७४३ करोना रुग्ण आढळून आले, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला.  जिल्ह्यात आढळून आलेल्या २ हजार ७४३ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई ९११, ठाणे ६७२, कल्याण-डोंबिवली ४३१, मीरा-भाईंदर २२९, ठाणे ग्रामीण २१६, उल्हासनगर १३२, अंबरनाथ ८०, बदलापूर ४० आणि भिवंडीमध्ये ३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवली पाच, नवी मुंबई तीन, अंबरनाथ दोन तर ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona vaccination in mumbai akp 94

ताज्या बातम्या