राज्यात पुन्हा करोना रुग्णवाढ

राज्यात दिवसभरात १०२० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ हजार २१९ इतकी आहे.

मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत होती, परंतु शनिवारी मात्र रुग्णसंख्येत वाढ झाली. राज्यात दिवसभरात ९९९ नवे रुग्ण आढळले, तर ४९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात १०२० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ हजार २१९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत मुंबई २४६, अहमदनगर ११०, पुणे जिल्हा ११६, पुणे शहर ९२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत २४७ नवे रुग्ण, २ रुग्णांचा मृत्यू

 शनिवारी मुंबईत करोनाच्या २४७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत राज्यात सात लाख ३७ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असा आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient high rate akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या