scorecardresearch

मुंबईतील करोना नियंत्रणात; दिवसभरात  २०१  रुग्ण; एकाचा मृत्यू

मुंबईतील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ५५ हजार  ३९४ वर पोहोचली आहे

corona-1200
करोना प्रातिनिधिक छायाचित्र

दिवसभरात  २०१  रुग्ण; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असून रुग्णवाढीचा वेगही मंदावला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात २०१ करोना  रुग्ण आढळले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

मुंबईतील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ५५ हजार  ३९४ वर पोहोचली आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १६ हजार ६८७ वर पोहोचली आहे.  दिवसभरात ३४५ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ३४ हजार २०७ रुग्णांनी करोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या एक हजार ६३२ सक्रिय करोना रुग्ण आहेत. शहरातील नवीन रुग्णांपैकी २६ जणांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिवसभरात मुंबईत ३६ हजार ८३३ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ९८ टक्के असून मुंबईतील करोना वाढीचा दर ०.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्णदुपटीचा दर दोन हजार ८७० दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात शनिवारी ७१ करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात १,६३५ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात १६३५ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली तर २९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १८ हजार ३३६ झाली आहे. भिवंडी, जळगाव, मालेगाव, चंद्रपूर, परभणी महापालिकांमध्ये दिवसभरात करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. गेल्या २४ तासांत  नाशिक ८५, नगर १०३, पुणे शहर २७८. पुणे जिल्हा १०९, पिंपरी-चिंचवड ११४, नागपूर १३८ नवीन रुग्णांची नोंद झाली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona positive rate in mumbai corona akp

ताज्या बातम्या